आरोग्य समृध्दी योजनेसाठी पात्रता :
१) शासकीय किंवा निमशासकीय (१००% अनुदानित) कार्यरत कर्मचारी या योजनेस पात्र आहे.
२) आरोग्य समृध्दी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकिय देखभाल) नियम : १९६१ व त्यानुसार निर्गमित केलेले नियम सुधारणेनुसार अवलंबून असणारे कुटुंबातील सभासद स्वतः व कुटूंबातील अवलंबून असलेली पती/पत्नी, पहिली दोन मुले दि. १ मे २००१ तत्पुर्वीचे अवलंबून असलेले ३ रे अपत्ये, अवलंबून असलेले आई-वडील, सासू सासरे हे पात्र राहतील.
३) कर्मचाऱ्यावरील अवलंबून असलेले अपत्या चे वय हे २५ पेक्षा कमी तसेच ते लग्न झालेले किंवा नोकरीस नसेल तर तो / ती या योजनेस पात्र आहे. निमसरकारी अवलंबून असलेले आईवडील किंवा महिला कर्मचान्याच्या बाबतीत आई वडील किंवा सासू सासरे राज्य / केंद्र सरकारी व निमसरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेले असल्यास व त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल/नसेल तरी अन्य मार्गांनी मिळणारे उत्पन्न हे दरमहा ९०००/- इतके मूळ निवृत्ती वेतन घेणाऱ्या सेवानिवृत्ती राज्य शासकीय कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या उपलब्धीच्या मर्यादेत म्हणजे ९००० /- कमी असेल तर ती/तो या योजनेस पात्र आहे
आरोग्य समृध्दी योजनेचे महत्वाचे फायदे :
१) महाराष्ट्रातील नामवंत हॉस्पिटल मध्ये २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांसाठी अॅडमिट झाल्यावर २४ तासात कॅशलेस सेवा उपलब्ध
२) २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांसाठी ३ लाखांपर्यंत कॅशलेस चा फायदा (ना देयकाचा समावेश नाही.)
३) ३ लाखांपर्यंत कॅशलेस संपल्यानंतर गरज भासल्यास अॅडिशनल २ लाख कॅशलेसची सुविधा संपूर्ण कुटूंबासाठी राखीव असेल.
४) डिस्चार्ज च्या वेळी ना देयक सोडून कोणतेही बिल न भरता डिस्चार्ज मिळेल.
५) डिस्चार्ज नंतर वैद्यकीय प्रतीपुर्ती फाईल बनविणे, फाईल कार्यालयात जमा करणे, जिल्हा शल्यचिकित्सका कडून पारित करणे, कार्यालयातील जमा असलेले बिला चे फॉलोअप घेणे इत्यादी कामे कंपनी करते.
महत्वाची सुचना :
१) डिस्चार्ज करतेवेळी वैद्यकीय प्रतिपूर्ती चे सर्व कागदपत्र वर सहीकरुन देणे बंधनकारक आहे. तसेच सॅलरी अकाऊंट चा (अकाऊंट पे) चेक व प्रॉमीसरी नोट देणे बंधनकारक राहील.
२) बिल पारित झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या अकाऊंटला जमा झालेली रक्कम कंपनीला डिस्चार्जच्या वेळी दिलेल्या सॅलरी अकाऊंटच्या चेकने २४ तासात देणे बंधनकारक राहील
शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमजी २००५/९/प्र.क्र.१/आ.३, दि. १९ मार्च २००५ चे सहपत्र परिशिष्ट अ
शासन विर्निदिष्ट २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी
१) हृदयविकाराचा झटका (Cardiac emergency), फुफ्फुसाच्या विकाराचा झटका, अॅन्जिओग्राफी चाचणी प्रमिस्तिक सहनी (Carebral Vasuclar)
२) अति रक्तदाब (Hypertension)
३) धनुर्वात (Titanus)
४) घटसर्प (Diphteria)
५ ) अपघात (Accident)आघात संरक्षण (Shock Syndrome) हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधी (Cardiological and Vascular)
६ ) गर्भ पात (Abortions)
७) तीव्र उदर वेदना / आंत्र अवरोध (Acute abdominal pains Intestial Obstruction)
८) जोरदार रक्तस्त्राव (Severe haemrbage)
९) गॅस्ट्रोएन्ट्रायटिस (Gastro- Enterietis)
१०) विषमज्वर (Typhoid)
११) निश्चिते ना वस्था (coma)
१२) मनोविकृती सुरुवात (Onset of psychiatric disorder)
१३) डोळ्यातील दृष्टी सरकणे (Retina detachment in the eye )
१४) स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार (Gynaecological and Obstetric Emergency)
१५) जनंमुत्र आकस्मिक आजार (Genito Urinary Emergency)
१६) वाय कोष (Gas gangrine)
१७) कान नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार (Foreign body in ear, nose or throat emergency)
१८)ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती (Cogenital Anamolles requiring urgent surgical Intervention)
१९) ब्रेन ट्युमर (Brain Tumor)
२०) भाजणे (Burns)
२१) इपिलेप्सी (Epilepsy)
२२) अॅक्यूट ग्लॅकोमा (Acute Glaucoma)
२३) स्पायपनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार
२४) उष्माघात
२५) रक्तासंबंधातील आजार
२६) प्राणी पावल्यामुळे होणारी विषवाधा
२७) रसायनामुळे होणारी विषबाधा
२८) कोविड-१९
गंभीर आजार भाग २
१) हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery)
२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (Bye Pass Surgery)
३) अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
४) मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation)
५) रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) Emergency)
सवलत कार्डचे फायदे :
१) महाराष्ट्रातील नामांकित नेटवर्क हॉस्पिटल मध्ये सर्व आजारांसाठी सवलत 10% ते 20%
२) CT SCAN वर 10% ते 20% सवलत Pathology Test वर 10% ते 20% सवलत
३) Diagnostic Center मध्ये 10% ते 20% या वर नेटवर्क / डायग्नोस्टीक हॉस्पिटल मध्ये सवलत दातांची तपासणी व इतर प्रोसेसवर 10% सवलत X-RAY वरती 10% ते 20% सवलत
४) कानामागील कर्णयंत्र 10% ते 20% सवलत
५) चष्म्या वरती 10% ते 20% सवलत मुळव्याध ऑपरेशन वर 10% ते 20% सवलत
६ ) नाक, कान, घसा हाडाच्या ऑपरेशन वर 10% ते 20% सवलत
पत्ता